सेलू (प्रतिनिधी) येथील लॉयन्स क्लबच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित नेत्र तपासणी शिबीरात 110 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी टप्याटप्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुयश पटवारी यांनी दिली.
येथील चिरायू रुग्णालयात रविवार दिनांक 02 नोव्हेंबर रोजी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. नेत्र तपासणीसाठी परतूर येथील लॉयन्स नेत्रालयाचे डॉ.रामेश्वर वानखेडे, कुंडलीक पावडे, डॉ किरण गायकवाड, योगेश केंधळे, भरत पौळ,यांनी काम पाहिले तर शेख फरीद, निता महाजन, माऊली भाबट, आनंदी काळे, गायत्री साळवे यांनी सहकार्य केले. तालुका सचिव डॉ बाळासाहेब जाधव,उपाध्यक्ष अजीत सराफ, कोषाध्यक्ष डॉ शैलेश मालाणी, डॉ उमेश गायकवाड, डॉ.अनुराग जोगदंड, राजेंद्र सराफ,डॉ परेश बिनायके,डॉ.कुंदन राऊत, दतात्रय सोळंके, डॉ कैलास आवटे,डॉ आशिष मेहता, दतात्रय अप्पूसेठ सोळंके,डॉ सुदर्शन मालाणी ,अनुप गुप्ता , कृष्णा काटे , जयसिंग शेळके , सुभाष मोहकरे आदी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.