सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या वर्ग पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील वस्त्र मूलभूत गरज हा पाठ शिकवण्यासाठी शिक्षकासह विद्यार्थी सेलू येथील खादी ग्रामोद्योग भंडारा ला भेट दिली. या भेटीत कपड्याचे तंत्रज्ञान टिकाऊ पणा तसेच खादीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
यावेळी सेलू येथील खादी ग्रामोद्योग भांडार चे संचालक भाऊ माणकेश्वर, आनंद बाहेती यांनी जवळपास 70 ते 80 विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणीत केला. यावेळी नूतन विद्यालयाचे शिक्षक भगवान देवकते सुशील कुलकर्णी, यांनी पुढाकार घेतला.