सेलू ( प्रतिनिधी) सेलू, येथे राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मा शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी, सेलू यांच्या मार्फत सादर करण्यात आले. या निवेदनात 2005 च्या शिक्षकांना टी ई टी सक्ती नसावी, संचमान्यतेसंबधात विद्यार्थी संख्या कमी करावी, अनावश्यक अशैक्षणिक कामे कमी करावीत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर धनंजय भागवत, जिल्हा सचिव राष्ट्रवादी शिक्षक सेल परभणी, देशपांडे ओ. डी,मगर शरद, नागरे शेषराव, सुनील मोरे, रामेश्वर कदम, संतोष कुलकर्णी, आबासाहेब सावंत, पवार ए बी, धनंजय मोरे, तोंदूलवार जी एल, शिंदे सी यु, रोंटेवाड एस आर, गिरी जे जी, गाडेकर आर वाय, तेलगोटे पी के, बेग एम एस, बोराडे, ए ए, कदम अभिजित आदींच्या सह्या आहेत. शहरातील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय,श्री के बा विद्यालय, यांनी शाळा बंद ठेऊन संपात पाठिंबा दिला.