आपला जिल्हा

सेलू नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मिलिंद सावंत आणि आत्माराम साळवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल.

सेलू ( प्रतिनिधी) सेलू नगरपालिका निवडणुकीसाठी सेलू नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती साठी राखीव असल्याने या ठिकाणी भाजपाच्या वतीने मिलिंद सावंत यांनी तर काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा संयुक्त उमेदवार म्हणून आत्माराम सावळे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

सेलू नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत “नगराध्यक्ष” पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिलिंद सावंत यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या वेळी राज्याच्या मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.श्रीमती मेघना दीदी बोर्डीकर,जिल्ह्याचे नेते माजी आमदार श्री रामप्रसाद जी बोर्डीकर, सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री मुकेश भाऊ बोराडे,माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे, भाजपचे निवडणूक प्रभारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री दिनकर वाघ,जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री अशोक काकडे,भाजपचे परभणी जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश भुमरे, भाजप सेलू तालुकाध्यक्ष श्री गणेश काटकर, भाजप सेलू शहराध्यक्ष श्री अशोक शेलार, यांची उपस्थिती होती.

काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा संयुक्त उमेदवारसेलू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) वतीने आत्माराम बालाजी साळवे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी आज, १७ नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज दाखल करताना काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हेमंत आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पुरुषोत्तम पावडे, नामदेव डख, उबाठा शिवसेना गटाच्या मंगलताई कथले, किशोर भांडवले, रघुनाथ बागल, मिलिंद पवार, सभाजी पवार, पप्पू गाडेकर, इसाक पटेल, मदनराव पवार, मशीद बागवान, अमजद बागवान, विनोद तरटे, गोटू धापसे, नर्सिंग हरणे, सुदर्शन शेरे, निसार पठाण, सचिन राऊत, म्हात्रे, जयराम महाराज तांगडे तसेच सेलू शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!