आपला जिल्हा
सेलूच्या कोहिनूर रोप्स प्रा. लि. यांना सलग चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य निर्यात उत्कृष्टता सुवर्ण पदकाने गौरव
उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते सोमवार दि.13 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे गौरव

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला वर्ष 2022–23 मधील उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल महाराष्ट्र उद्योग विभाग आयोजित भव्य सोहळ्यात ताज पॅलेस, बांद्रा (मुंबई) येथे सुवर्ण पदक निर्यात उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्या मुळे सेलूसह परभणीजिल्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे , माननीय उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत, माननीय मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी, माननीय उद्योग सचिव डॉ. पी. अंबालगन, तसेच माननीय उद्योग विकास आयुक्त श्री दिपेंद्र सिंह कुशवाहा आणि इतर अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कंपनीतर्फे हा बहुमान संचालक श्री राम वल्लभ बाहेती आणि श्री महेश बाहेती यांनी विनम्रतेने स्वीकारला.
विशेष उल्लेखनीय म्हणजे हा सलग चौथा वर्ष आहे की कोहिनूर रोप्स प्रा. लि. यांना महाराष्ट्र शासनाकडून निर्यात क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव मिळत आहे, ज्यामुळे त्यांचे भारताच्या औद्योगिक प्रगतीतील अग्रगण्य स्थान अधिक भक्कम झाले आहे.
हा मान कोहिनूर परिवार आपल्या निष्ठावंत कामगार बांधवांना, जगभरातील ग्राहकांना आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रगतिशील औद्योगिक दृष्टीकोनास आदरपूर्वक अर्पण करतो.

या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य तथा उदयोजक नंदकिशोर बाहेती यांचा नूतन विदयालय सेलूच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी नूतन विद्यलाय शिक्षण संस्थेचे सहसचिव उदयोजक मा. जयप्रकाशजी बिहाणी, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशसकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के. के. देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड सह शिक्षक यांची उपस्थिती होती.



