आपला जिल्हा

सेलू येथे “क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे भूमिपूजन सोहळा संपन्न

विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली पाहिजे - डॉ अनिल काकोडकर

सेलू ( प्रतिनिधी ) राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र व श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सेलू तालुक्यात “क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर” या महत्वाकांक्षी विज्ञान केंद्राचा भूमिपूजन सोहळा आज (ता.११) शनिवार रोजी प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे पार पडला.

या भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटन अणुशास्त्रज्ञ, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कमिशन महाराष्ट्र राज्य, माजी अध्यक्ष भारतीय अणुऊर्जा मंडळ तथा भारत सरकार अणुऊर्जा विभाग अधिकारी डॉ. अनिल काकोडकर याच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कमिशनचे वैज्ञानिक दिनेश जगताप ,
इ.मा.ब.क. परभणी विभागाचे सहाय्यक संचालक, रामेश्वर मुंढे, श्रीनिवास औंधकर, डॉ. सुनिल मोडक, प्रा. महेश पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती शालिनीताई काटकर, कृउबासमितीचे संचालक शेलेंद्र तोष्णीवाल, डॉ. सविता रोडगे, डॉ गणेश पारवे, डॉ. अपुर्वा रोडगे, सुजित काटकर, सुजाता काटकर व महोम्मद इलियास आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात ए.पी.जे अब्दुल कलाम, सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमापूजन व द्विपप्रज्वलनाने करण्यात आली.

मराठवाडा मागासलेला, अंधश्रद्धेला बाधित असलेला आहे येथील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी या सेंटरचा फायदा होणार आहे. या केंद्राच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश म्हणजे शालेय व कॉलेजातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढवणे, प्रयोगात्मक शिक्षणाला चालना देणे व नवकल्पनांची जाणीव निर्माण करणे. या सेंटरमुळे जिल्ह्यामतील विद्यार्थी दूरगामी अभ्यासापासून प्रेरणा घेतील, आणि भविष्यात संशोधन/उद्योगक्षेत्रात वाटचाल करण्यास मदत होईल. एक आय ला टक्कर ला देऊन तुम्हाला समोर जावे लागेल रोबोटिक्स व ए आय सारख्या आक्रमणाला तोंड देणारे विद्यार्थी घडवू. असे डॉ.‌रोडगे म्हणाले
भारत हा जगातील अग्रेसर देश व्हावा असे स्वप्न आहे. भारतीय संस्कृती चांगली असून चांगल्या प्रकारे शिकवण आपल्याला दिली म्हणून सक्षम नागरिक म्हणून सामोरे यावे. जगात समस्या निर्माण झाली की, जगाने भारताकडे यावे काही खुरापती निर्माण झाली की वचक भरावा असा भारत देश तयार व्हावा. आपल्याकडील संसाधन व तरूणाई महत्वाचा घटक आहे. तरुणाईच भारत देश अग्रेसर म्हणून आणणार क्युरिऑसिटी निर्माण झाली तरच समाधान वाटेल. जे माहिती नाही ते समजावून घेईल अशा प्रकारची जिद्द निर्माण होण महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, वैज्ञानिक संकल्पना समजावून घ्यावी. जशी संसाधने उपलब्ध होतील तसे सेंटर निर्माण होतील सहभागाने निर्माण केलेली सेंटर आहेत. या सेंटर मध्ये इनोव्हेटिव्ह वैज्ञानिकांची फौज तयार व्हावी त्यांच्या कार्यात योगदान देतील तेव्हा अग्रेसर देश होईल. आपल्या एकत्रित हे काम साध्य करायचं आहे. कामामध्ये सातत्य व उदिष्ट असावे. त्यामुळे डॉ रोडगे यांनी आपले उद्दिष्ट या सेंटर बाबत ठरवून प्रयत्न व तयारी करून या सेंटरचा उपक्रमात, मेहनतीत जिद्दीने संस्थेस पुर्ण सफलता लाभेल असा मला विश्वास आहे असे डॉ.अनिल काकोडकर म्हणाले.
यासह पोलिस अधिक्षक रविद्रसिंह परदेशी, प्रा. महेश पाटील यांनी मनोगत मांडले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिलजी मोडक यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष मोहकरे यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!