परभणी ( प्रतिनिधी ) बाल विद्यामंदिर हायस्कुल,वैभव नगर, परभणी या शाळेत एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा सुरळीत संपन्न झाल्या.विद्यार्थी अगदी रममान होऊन चित्र रेखाटण्यात मग्न होते.सकाळ सत्रात बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.नंदकुमार झरकर साहेब, सचिव श्री. विवेक नावंदर साहेब यांनी भेट देऊन पाहणी केली.
विद्यार्थी कलाकृतीत मग्न असल्याचे पाहून त्यांना आनंद झाला. परीक्षेच्या उत्कृष्ट नियोजनाबाद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व उत्कृष्ट अभिप्राय नोंदवला. त्याच बरोबर दुपार सत्रात जि.प.शिक्षण विभागातर्फे उप शिक्षणाधिकारी ( माध्य.) मा. गोविंद मोरे साहेब यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली.त्यांनीही सर्व विद्यार्थी बैठक व्यवस्था व नियोजन याबद्दल समाधान व्यक्त करून छान असा अभिप्राय नोंदवला. बा.वि.मं.चित्रकला विभाग प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष,परभणी श्री केशव लगड,त्यांना सहाय्यक श्रीमती निर्मला सोडेगावकर ,श्री. मजगे गजानन,कु सिद्धी बेंडे आणि दोनही सत्रातील शिक्षकांचे अभिनंदन केले.मान्यवरांचे स्वागत केंद्र प्रमुख तथा प्राचार्य श्री.अरुण बोराडे, विभाग प्रमुख श्री.प्रदीप रुघे यांनी केले.