आपला जिल्हा

ऋतुरंग चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण थाटात संपन्न

"*कला ही पुढील पिढीला जगण्याचे बळ व प्रेरणा देते" - राज्य सरचिटणीस श्री.दिगंबर बेंडाळे

परभणी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ,पुणे आयोजित जिल्हा व राज्यस्तरीय ऋतुरंग चित्रकला स्पर्धा संपूर्ण राज्यात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण रविवार दिनांक 21/ 9 /2025 रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी येथे अतिशय थाटात संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे राज्य सरचिटणीस मा.श्री दिगंबर बेंडाळे हें होते तर उदघाटन जिंतूर तालुक्याचे बी.ई.ओ मा. त्र्यंबक पोले यांच्या हस्ते सम्पन्न झाले.कलाध्यापक संघांचे राज्य सरचिटणीस श्री.दिगंबर बेंडाळे यांनी आपल्या मनोगतात बोलताना “कला ही पुढील पिढीला जगण्याचे बळ व प्रेरणा देते” असे गौरवोदगार काढले.
तर कलाध्यापक तथा जिल्हाध्यक्ष श्री.केशव लगड यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुंणांना योग्य संधी मिळवून दिल्यास त्याचे जीवन इंद्रधनुष्याप्रमाणे तेजस्वी व आनंददायी घडू शकते असे विविध विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशा पेंटिंग व नटराज मूर्तिचे पूजन करून व दिपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक परभणी जिल्हा कलाध्यापक संघांचे जिल्हासचिव श्री अतुल सामाले यांनी केले.या प्रसंगी कलाध्यापक संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष मा.श्री.माधव घयाळ,
प्राचार्य डी.जी.सानप, मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत गरुड,श्री.दिलीप सोनकवडे, श्री.सुधाकर आंदोले,उपाध्यक्ष श्री.सोमनाथ नागठाणे,श्री. नारायण गौरकर,
श्री.गोविंदराव शिंदे,श्री. बाळकृष्ण केदारी, श्री.बबनराव राऊत, श्री.अनंत भुसारे,ऍड. देशपांडे हें उपस्थित होते.
या प्रसंगी सभागृहाच्या प्रांगणात रांगोळी आर्टिस्ट श्री.ज्ञानेश्वर बर्वे यांनी ‘ऋतुरंग’ भव्य व आकर्षक रांगोळी काढून सर्वांची मने जिंकली.
तसेच सेलू तालुका संघांचे सचिव तथा कलाशिक्षक श्री.संतोष ताल्डे यांनी विद्यार्थ्यासाठी शासकीय रेखाकला परीक्षेची तयारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अशा विविध कलाकृतिचे प्रदर्शन भिंतीवर लावले होते.
या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातून एकूण 6740 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवाला होता.यातून 22 विद्यार्थ्यांच्या कलाकृतीना राज्यस्तरीय पुढील स्पर्धेसाठी पाठवण्यात आले आहे.
तसेच याप्रसंगी जिल्ह्यातील 36 शाळांचे निवडक विद्यार्थी, व उत्स्फूर्त विद्यार्थी सहभागाबद्दल 20 कलाशिकांचा व 4 मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.अतुल सामाले,श्री.रमेश चव्हाण,श्री.सोमनाथ नागठाणे, श्री.किरण वसमतकर, श्री.उद्धव पांचाळ, श्री.शेख जाहीद उमर,,श्री.संतोष ताल्डे,श्री दुधाटे सर,श्री.ज्ञानेश्वर बर्वे,श्री.नागरे,मनोहर उगले,श्री.ज्ञानेश्वर कौसाईतकर,श्री.खाणम आदीनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन सौ.मनिषा उमरीकर यांनी केले तर सर्वांचे आभार परभणी तालुका प्रमुख श्री.उद्धव पांचाळ यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!