आपला जिल्हा

राष्ट्र उभारणीत विश्वेश्वरैय्या यांचे मोठे योगदान- इंजि.जाधव*

श्रीराम कंन्स्ट्रक्शनच्या वतीने 50 अभियंत्यांचा सन्मान

सेलू(  प्रतिनिधी) स्वातंत्र्या नंतर राष्ट्र उभारणीचे मोठे आव्हान होते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांनी हे आव्हान स्विकारून सक्षम राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले असे प्रतिपादन परभणी जिल्हा परिषदेचे उप अभियंता कठाळू जाधव यांनी केले.

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्य श्रीराम कंन्स्ट्रक्शनच्या वतीने हॉटेल परिवार येथे आयोजित “अभियंता सन्मान सोहळ्यात” कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अभियंता आर. जे.पठाण,इंजि.रविंद्र मंत्री, न.प.चे नगररचनाकार इंजि.इंदापूरकर,शहर अभियंता काशिनाथ धुळगुंडे, तालुकाध्यक्ष सुशील नाईकवाडे संयोजक दतात्रय सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभियंता दिनानिमित्य श्रीराम कंन्स्ट्रक्शनच्या वतीने सेलू- जिंतूर तालुक्यातील सर्व अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंजि.आर.जे.पठाण, इंजि. इंदापूरकर, इंजि. बालाजी उदावंत यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्याची अनुभवातून आलेली माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील नाईकवाडे, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर ज्ञानेश्वर मते यांनी आभार मानले. जेष्ठ अभियंता भास्करराव कोलते, बलदेवा, गंगाधर आडळकर, प्रमोद जोशी, पुरुषोत्तम शिंदे, उदय दडके, प्रशांत मानकेश्वर , पृथ्वीराज भांबळे,आदित्य पांचाळ इत्यादी 50 अभियंत्यांचा कार्यगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास राऊत,बाबाराव वायाळ,उद्धवराव अंभुरे,सिध्देश्वर खोसे पाटील,अमोल जोशी, श्रीसर गांजाळे,सिध्देश्वर सोळंके,पंजाब देशमुख, अमोल देशमुख,ओंकार दळवे,परमेश्वर गिनगीने, अमोल देशमुख,नितीन सोळंके,लक्ष्मण मोरे, स्वप्नील फरकांडे, सुदर्शन राऊत आदिंनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!