सेलू (प्रतिनिधी) अजंठा एक्सप्रेस या सुपरफास्ट एक्सप्रेस ला 10 सप्टेंबर 2025 पासून पूर्ववत थांबा मिळाल्याने सेलू रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले.
रेल्वे ड्रायव्हर विकास सिंह, स्टेशन मास्टर सोमनाथ राऊत, बुकिंग क्लार्क सुहानी यांचे पुष्पाहार घालून मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, माजी न.प सदस्य मनिष कदम, बल्लभ राठी, शेख मुनीर, भगवान पावडे, विजयकुमार पटेल, सिद्दीक मोदी, लाली गेणा ,बालाजी राऊत, यांची उपस्थिती होती. कोविड 19 पासून सेलू रेल्वेस्थानकावर बंद झालेल्या अजंठा एक्सप्रेस ला पूर्ववत थांबा देण्याची मराठवाडा रेल्वे संघाच्या वतीने करण्यात आली होती. ती रेल्वे प्रशासनाने मंजूर केल्यामुळे तसेच पालकमंत्री व खासदार यांनी लक्ष घातल्यामुळे थांबा पूर्ववत झाले आहेत त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.