आपला जिल्हा

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विशेष प्रयत्नातून 500 इमारत कामगारांना साहित्य वाटप

सेलू ( प्रतिनिधी.)17 एप्रिल महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून व पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या विशेष प्रयत्नातून चिकलठाणा सर्कलमधील 22 गावांतील 500 इमारत कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानाजवळ हा कार्यक्रम पार पडला. याआधी अनेक एजंट लाभार्थ्यांकडून दिड दिड हजार रुपये घेऊन, संसारोपगी साहित्य आणण्यासाठी जिल्ह्याच्या चकरा माराव्या लागत होत्या, लाभार्थ्यांची अडवणूक करत होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बोर्डीकर यांनी हस्तक्षेप करत गरजू कामगारांना थेट लाभ मिळवून दिला.

कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, डॉ.गणेश थोरे, रवींद्र डासाळकर,शहराध्यक्ष अशोक अंभोरे,
युवा तालुकाध्यक्ष गणेशराव काटकर, अजय डासाळकर, कपिल फुलारी, शिव हरी शेवाळे भागवत दळवी लक्ष्मण आण्णा गायके दामोदर काकडे महेश टाके नामदेव झिंबरे संदीप घुगे,महिला तालुकाध्यक्ष वनिताताई चाफेकर ज्योतीताई मोगल, प्रीती पवार.आदी मान्यवर उपस्थित होते.
साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक ताठे, श्रीकर दीक्षित, अजित मोगल, प्रकाश शेरे, शिवाजी हिंगे खाजा बेग नामदेव आवटे महेश नावाडे यांनी परिश्रम घेतले..!

Related Articles

Back to top button
Don`t copy text!