आपला जिल्हा
17-परभणी लोकसभा मतदार संघात अंदाजे एकुण 60.09 टक्के मतदान

परभणी, दि. 26 ( प्रतिनिधी ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दूसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार, (दि.26) रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. परभणी लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी एकूण अंदाजे 60.09 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.




