परभणी/प्रतिनिधी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची महाराट्राची नूतन कार्यकारणी जाहीर झाली. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील विविध विभागीय, जिल्हा व महानगर स्तरावरील पदांवर नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये परभणी महानगर जिल्हाध्यक्ष पदी अनिल गोरे यांची समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती करण्यात आली.