सेलू (प्रतिनिधी) सेलू येथील रेल्वे स्थानकावर नरसापूर- नगरसोल, अजंठा एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस व शिर्डी साईनगर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, छत्रपती संभाजीनगर ते नागपूर व्हाया हिंगोली ही नवीन रेल्वे गाडी सुरू करावी अशी मागणी द.म.रे. चे डी.आर.एम. प्रदिपकुमार कांबळे यांना मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
मंगळवार दिनांक 05 ऑगस्ट रोजी अमृत भारत योजने अंतर्गत सेलू रेल्वे स्थानकाच्या विस्तारीत विकास कामांची पाहणी करण्यासाठी ते आले असताना प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी , प्रविण मानकेश्वर, शेख मुनीर भाई, विशाल लोया, निरज लोया, गणेश गोरे, शिवकुमार नावाडे यांनी भेट घेऊन चर्चा केली. तसेच एल.सी. गेट क्रमांक 100 पासून भूयारी मार्गाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी केली. तसेच या सर्व गाड्यांना सेलू स्थानाकावर थांबा मिळाल्यास पिठापुरम ला जाण्यासाठी भाविकांची सोय होणार असून श्रीक्षेत्र सेलू हे दत्तगुरूंची तपोभूमी असल्यामुळे भावीकांची संख्येत मोठी वाढ होणार आहे.अरविंद कुमार कांबळे यांनी सकारात्मक चर्चा केली.