आपला जिल्हा

अश्लील कमेंट करणाऱ्या विरोधात सेलूत भाजपाच्यावतिने कारवाहीची मागणी

जिंतूर येथील घटनेचा निषेध उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दोषींवर कठोर कारवाहीची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विषयी इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट केल्यामुळे जिंतूर येथील एक जनावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाहीची मागणी भाजपाच्यावतिने सोमवार २४ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासुन मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्यावरून आरोप प्रतीआरोपाचे सत्र सुरू आहे परिणामी याची धग गावखेड्या पर्यंत पोहचली आहे.जिंतूर तालूक्यातील अल्पवयीन मुलाने भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बदल इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट केली.सदरिल मूलावर कठोर कारवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्यावतिने करण्यात आली आहे.यासाठी भागवत दळवे,अँड.दत्तराव कदम,अशोक अंभोरे, गणेश काटकर,अँड.रामेश्वर शेवाळे,संदिप बोकन,बाळू काजळे,अजय डासाळकर,राजू सोळंके,नामदेव झिंबरे,दिलीप मगर,एकनाथ सारूक,अभय महाजन,प्रकाश शेरे,महेश नावाडे,सूदाम रोकडे,प्रल्हाद गोरे आदींनी पूढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!