सेलू ( प्रतिनिधी) पर्यावरणाचे संतुलन राहावे पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी दीपस्तंभ प्रतिष्ठान,आर्यवैश्य समाज आणि सेलू महिला मंडळाच्या वतीने शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
आर्य वैश्य समाज भूषण तथा निसर्गप्रेमी ,वनरक्षक माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार (मा. अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या( ३० जुलै ) वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आर्यवैश्य समाज,दीपस्तंभ प्रतिष्ठान व महिला मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम वृक्षारोपण हा सामुदायिक उपक्रम तिन्ही घटकांकडून राबवण्यात आला,पर्यावरणाचे संतुलन राहावे यासाठी वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी प्रदूषण रोखण्यासाठी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे हेच विचार घेऊन शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण हा सामूहिक पणे राबवण्यात आला.या कार्यक्रमाला दिपस्तंभ प्रतिष्ठानचे माधवअण्णा लोकूलवार , विवेकानंद विद्यालयाचे स्थानिक अध्यक्ष हरिभाऊ चौधरी ,उपेंद्र बेल्लुरकर ,करुणा कुलकर्णी ,मुख्याध्यापक शंकर शितोळे ,भाजपचे शहराध्यक्ष अशोक शेलार ,मनीष कदम ,संध्या चिटणीस ,रुपाली ठाकूर ,महिला मंडळाच्या ललिता गिल्डा ,मंजुषा सेलगावकर,यशोदा कुंदनानी ,बालाजी मोटरवार ,राजश्री लोकूलवार,मोहन व मंजुषा कोत्तावार ,विकास व सुचिता गादेवार ,नागनाथ व सविता कलकोटे,बालाजी व रजनी काचेवार ,अनिल बंडेवार ,संजय व सुजाता कोटलवार ,गजानन फुटाणे,ज्ञानेश्वर फुटाणेराजेश्री फुटाणे ,कैलास व अश्विनी मरेवार ,कल्पना डाचेवार ,गौशेटवार ताई ,शशिकांत मालशेटवार ,प्रवीण कोत्तावार ,प्रसाद काचेवार यांची उपस्थिती होती.