आपला जिल्हा

‘महाज्योती’ मार्फत विद्यार्थ्यांना टॅब वाटप

परभणी, दि.05( प्रतिनिधी ): इतर मागासप्रवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने (महाज्योती) जिल्ह्यातील एमएच-सीईटी, जेईई, नीट-2005 परीक्षा पूर्वचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव अमित घवले यांची उपस्थिती होती.

महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांनी कसोशीने प्रयत्न केल्यास प्रत्येकाचा भविष्यकाळ हा उज्ज्व ल होतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी टॅबच्या माध्यमातून परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन घ्यावे. सर्व विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत व नीट परीक्षेत यश मिळवण्याचे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने विज्ञान शाखेचे विद्यार्थी पालक-कर्मचारी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन श्री. आर. बी. वजीर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!