सेलू ( प्रतिनिधी ) सेलू नगरपालिका हद्दीतील राज्य मार्ग रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट पर्यंत असलेला सिमेंट काँक्रेट रोड वरील अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे याकरिता सेलू नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या मार्गावर लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे नसता आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन.भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते यांच्यातर्फे देण्यात आले आहे . या निवेदनावर संदीप बोकन. लालू खान. सुनील चव्हाण. काना शर्मा. शेख आतिक. रफिक बेलदार. राजू भाई. असलम बागवान. नीरज लोया. नागेश ठाकूर. प्रकाश शेरे. मुकुंद गजवल.यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.