सेलू ( प्रतिनिधी ) – सेलू शहर नगरपालिका हद्दीतील राज्यमार्ग २५३ पासुन दारुल उलूम उर्दू मदरसा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते रा.म.मा. ५४८ वी किमी ०/०० ते ३/५०० रस्ता दुभाजकासह चार पदरी सी.सी. रस्ता, पेव्हर शोल्डर, नाली, यूटीलीटी पथदिवे, वृक्षारोपणासह सुधारणा करणे प्रजिमा २८ रस्त्यावरील अतिक्रमण काढणे बाबत दि 17 जुलै रोजी नोटीस काढण्यात आली.
वरील विषयी आपणांस नोटीस देण्यात येते की, सेलू शहर नगरपालिका हद्दीतील राज्यमार्ग २५३ पासून दारुल उलूम उर्दू मदरसा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान किमी ०/०० ते १/५०० मध्ये रस्ताच्या उजव्या डाव्या बाजूला रस्त्याच्या हहीत आपण अतिक्रमण केलेले आहे. या उपविभागास आर.सी.सी. नालीचे काम करावयाचे असल्याने सदरील अतिक्रमण दिनांक 28/07/२०२५ पर्यंत काढून घ्यावे अन्यथा या कार्यालया मार्फत सदरील अतिक्रमण हटविण्यात येऊन अतिक्रमित सामानाची जप्ती करण्यात येईल. तसेच अतिक्रमण हटवताना सामानाची तोडफोड व नासधूस झाल्यास आपण स्वतः त्यास जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.