सेलू ( प्रतिनिधी ) शाळा टप्पा बाढीसाठी पुरवणी मागणी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दिनांक ८ व ९ जुलै रोजी राज्यातील प्राथमिक
माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद ला मराठवाडा शिक्षक संघाने पाठिंबा दर्शवला होता.
वरील विषयास अनुसरून दिनांक ५ जून २०२५ पासून शिक्षक समन्वय संघातर्फे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अंशत अनुदानित शाळांचे अम्दोलन सुरू आहे पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांच्या निधीसाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल असा शब्द दिला होता. पण तरतूद झालेली नसल्यामुळे राज्यभर आयुष्यात अनुदानित बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच शासनाने वेळोवेळी आश्वासने देऊन सुद्धा या शिक्षकांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे राज्यभर शिक्षकांच्या मनामध्ये असंतोष पसरलेला आहे याचा निषेध माणून दिनांक आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून निषेध नोंदविला जात आहे.
तरी शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार आर्थिक तरतूद करावी. व इतर मागण्यासाठी सेलू तालुका मराठवाडा शिक्षक संघातर्फे शाळांना भेटी देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी रामेश्वर घनवट,बालाजी बुधवांत, पांडुरंग सोळंके,दत्ता नाईकनवरे, सोळंके एम ए, लिपणे एस,जाधव के. व्हि., व्हि.बी. सुवर्णकार,गावंडे ए. एस, धापसे व्हि., डॉ. संतोष मलसटवाड, अनंतकुमार विश्वंभर धापसे व्हि यू आदिनी पुढाकार घेतला.