सेलू ( प्रतिनिधी) सेलूतील आठवडी बाजार अतिक्रमण प्रकारणी अखेर मुख्याधिकारी सेलू यांनी चौकशीचे आदेश काढले असून तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या कामी श्री. भगवान चव्हाण, उपमुख्याधिकारी, न.प.सेलू,श्री. उबेद चाऊस, प्रशासकीय अधिकारी, न.प. सेलू,श्री. मोहम्मद अफजलोद्दिन, अतिक्रमण विभाग, न.प. सेलू,श्री. ज्ञानेश्वर जाधव, स्थापत्य अभियंता, न.प.सेलू,श्री. नंदकिशोर दायमा, सहा करनिरीक्षक, न.प. सेलू,श्री. अक्षय इंदापूरकर, सह नगररचनाकार, न.प.सेलू,श्री. सदानंद देशमुख, सह नगररचनाकार, न.प. सेलू,श्री. ज्ञानेश्वर पारसेवार, स्वच्छता निरीक्षक, न.प. सेलू यांना लेखी आदेश काढून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्याधिकारी यांनी पुढील प्रमाणे आदेशीत केले आहे. संदर्भीय तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आपणास आदेशित करण्यात येते कि, आठवडी बाजार येथे भाडे तत्वावर देण्यात आलेल्या जमीन व दुकाने विषयी संबंधित तक्रारदरांनी तक्रार अर्जात नमूद केल्या प्रमाणे आठवडी बाजार येथील जमीन व दुकान भाडेकरुनी भादेतात्वार दिलेल्या हद्दीपेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण केल्याचे संदर्भीय अर्जातून दिसून येते. तसेच आठवडी बाजार येथे नगर परिषद मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे संबंधित अर्जदारांनी कळविले आहे.
करीता आठवडी बाजार सेलू येथे जाऊन उपरोक्त पथक यांनी सदरील जागांची तत्काळ स्थळ पाहणी करून एकत्रित अहवाल माझ्या समक्ष सादर करावा.