सेलू ( प्रतिनिधी) सेलू येथील आठवडी बाजार येथे बऱ्याच दुकान मालकांना नगर परिषदेकडून दुकान जागा वापरण्यास दिलेली आहे.
यामध्ये संबंधीत दुकानदारांनी नगर परिषदेने दिलेल्या दुकान जागेच्या बाहेर परस्पर आपल्याला विश्वासात न घेता बांधकाम करुन अतिक्रमण केलेले आहे. या संबंधीत आपल्या कार्यालयाकडून अतिक्रमण काढण्याबाबत सुचना दिलेला आहे.
नगर परिषद कार्यालयाकडून संबंधीत दुकानदाराना सन 2012 पासून ते आजपर्यंत दुकान जागा वापरण्यास दिलेली आहे. यामध्ये नगर परिषदेची दिशाभूल करुन अतिरिक्त जागा घेऊन अतिक्रमण करण्यात आलेले आहे.
तरी नगर परिषद सेलू यांच्या जुन्या भाडेपट्याद्वारे दिलेल्या व रिव्हीजन रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या व मोजणीनुसार इतर जास्तीच्या अतिरिक्त जागेवरील बांधकाम केलेल्या अतिक्रमण धारकांचे सर्व अतिक्रमण काढण्यात यावे.
व दुकान जागेची बांधकाम परवानगी नसताना सुध्दा आठवडी बाजार येथे गैर मार्गाने दुकाने बांधकाम करण्याची कोणत्या आधारे परवानगी दिली याची चौकशी करुन संबंधीतावर कडक कार्यवाही करण्यात यावी नस्ता लोकशाही मागीने अन्दोलन करण्यात येईल.अश्या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी सेलू यांना दिले आहे. या निवेदनावर सय्यद मुश्ताक रब्बानी माजी नगरसेवक, सेलू,शेख आरेफ शेख मजीद, शेख रफीक शेख हुसेन,लालुखान पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.