आपला जिल्हा

मुकुंद सावजी कळमकर यांना सहकार भूषण तर आर बी घोडके यांना उद्योग रत्न पुरस्कार जाहीर

तालुका प्रेस क्लब व व्हॉइस ऑफ मिडिया चा उपक्रम

जिंतूर ( प्रतिनिधी ) जिंतूर तालुका प्रेस् क्लब व व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त जिंतूर येथील सुंदरलाल सावजी बँकेचे चेअरमन मुकुंद सावजी कळमकर यांना सहकार भूषण तर उद्योजक आर बी घोडके यांना उद्योग रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला

तालुका प्रेस क्लब व व्हाईस ऑफ मिडिया च्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून 21 जानेवारी 2024 रोजी एका भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे प्रदान करण्यात येणार आहे मागील अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात सुंदरलाल सावजी बँकेच्या माध्यमातून जिंतूरला नावलौकिक मिळून दिला याची दखल घेऊन यावर्षी मुकुंद सावजी कळमकर यांना सहकार भूषण हा पुरस्कार देण्यात येत आहे पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, पगडी, शाल, श्रीफळ अशी आहे तर आर बी घोडके हे कंत्राटदार आहेत संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते निर्मिती क्षेत्रामध्ये अनेक दर्जेदार व टिकाऊ वस्तु त्यांनी निर्मित केले आहे आपल्या भागातील चारठाणा ते वाटुर फाटा हा रस्ता अत्यंत कमी वेळेत व चांगल्या दर्जाचा निर्माण करून त्यांनी या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला आहे याची दखल घेऊन तालुका प्रेस क्लब, व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने त्यांना उद्योग रत्न पुरस्कार देण्यात येत आहे या दोन्ही पुरस्काराचे वितरण 21 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भाजी मंडी मैदान जिंतूर येथे प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे , व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी मस्के व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा अध्यक्ष व जिंतूर तालुका प्रेस क्लबचे संस्थापक विजय चोरडिया तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष मंचक देशमुख व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष भागवत चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!