आपला जिल्हा

सेलू शहरात बालकामगारांविरोधात जनजागृती साठी धाड पथक सेलूत दाखल

सेलू (प्रतिनिधी) :कामगार विभागाच्या निर्देशानुसार, परभणी जिल्ह्यातील बालकामगार निर्मूलनासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष अभियानांतर्गत धाड समितीचे पथक सेलू शहरात दाखल झाले. या अभियानात बालकामगारांविरोधात जनजागृती करण्यात आली असून, स्थानिक व्यवसायिक, दुकानदार, आणि नागरिकांना बालकामगार न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

या विशेष मोहिमेच्या माध्यमातून कामगार विभागाचे निरीक्षक
अ,मु. सौदागर (दुकाने निरीक्षक, परभणी) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

“बालक हा कामासाठी नव्हे, शिक्षणासाठी आहे. बालकामगार ठेवणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बालकांना शिक्षणाकडे परावृत्त करा. त्यांना शैक्षणिक साहित्य लागल्यास कामगार विभाग व संबंधित एनजीओच्या वतीने त्यांना मदत करण्यात येईल.”

बालकामगार निदर्शनास आल्यास 1098 वर माहिती द्या

यावेळी नागरिकांना सांगण्यात आले की, कुठेही बालकामगार दिसल्यास तात्काळ चाइल्डलाइन नंबर 1098 वर माहिती द्यावी. ही माहिती गुप्त ठेवण्यात येईल.

समितीची उपस्थिती आणि निरीक्षण

या धाडसत्रात परभणी येथून आलेल्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला. समितीत सहभागी अधिकारी यु.एस.पतंगे,अनंता सोगे,लक्ष्मण गायकवाड (एनजीओ प्रतिनिधी),एस.एम.घुगे,नागनाथ कर्वे अधिकारी होते

कार्यवाहीपूर्वी हे सर्व अधिकारी सेलू पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. दीपक बोरसे यांची भेट घेऊन मोहिमेची माहिती दिली. पोलिसांनीही या उपक्रमाला सहकार्य दर्शवले.
जनजागृतीचा उद्देश

या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे:

बालकामगारांचा वापर थांबवणे

गरीब आणि वंचित कुटुंबांतील मुलांना शिक्षणाकडे वळवणे

पालकांमध्ये जागृती निर्माण करणे

कायदेशीर कार्यवाहीबाबत माहिती देणे
सामाजिक परिवर्तनाची दिशा

हे अभियान केवळ धाडसत्रापुरते मर्यादित न ठेवता, सतत जनजागृती करून समाजात सकारात्मक बदल घडवणे हा यामागचा उद्देश आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, बालकांच्या भविष्यासाठी शासनाची ही पावले खरोखर प्रेरणादायी ठरली आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!