आपला जिल्हा
पालकांनो, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यशाळेत सहभागी व्हा!

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू, दि. 12 जून प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू यांच्या वतीने पालकांसाठी एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 13 जून 2025 रोजी साई नाट्य मंदिर, सेलू येथे सायंकाळी 5:00 वाजता होणार आहे. या कार्यशाळेत ऑनलाइन आणि ऑफलाइन सत्रांद्वारे पालकांना मुलांच्या शिक्षण आणि पालकत्वाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.




