आपला जिल्हा
साईबाबा नागरी सहकारी बँक आष्टी शाखेचा माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा

सेलू ( प्रतिनिधी ) साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलू यांच्या आष्टी शाखेचा लोकार्पण सोहळा दिनांक ०५ जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता थाटामाटात संपन्न झाला. या शुभप्रसंगी बँकेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि हितचिंतक यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. बँकेच्या विस्ताराच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो आष्टी परिसरातील नागरिकांना आर्थिक सेवा प्रदान करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करेल.




