आपला जिल्हा

समाज जीवनाचा आरसा म्हणजे साहित्य होय – प्रा के डी वाघमारे

सेलू( प्रतिनिधी ) दि.18 जानेवारी परिश्रमाने माणूस आयुष्यात यशस्वी होतो.विद्यार्थ्यांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता सतत ध्येय समोर ठेवावे आणि ते गाठावे.आई वडिलांच्या कष्टाचं चीज करणं आपलं आद्य कर्तव्य आहे.ग्रामीण भागात आजही भारतीय संस्कृती टिकून आहे जी भारतीय समाज व्यवस्थेचा पाया आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रा के डी वाघमारे यांनी ग्रामीण संस्कृती या विषयावर नूतन महाविद्यालय सेलू येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक शिबिर ‘युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी’
या विषयांतर्गत चौथ्या दिवशी काजळी रोहिना येथे दिनांक 15 ते 21 जानेवारी 2025 रोजी संपन्न होत असलेल्या शिबिरात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा विकास ढाले हे होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा कारके यांनी केले.
सूत्रसंचालन वेदांत मगर तर आभार सचिन मिसाळ यांनी मानले.
शिबिराच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक अनंत मोगल तर अध्यक्ष म्हणून प्राध्यापक हनुमान व्हरगुळे हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना‘युवा भारत – आव्हाने आणि संधी ’ या विषयावर मार्गदर्शन केले. रात्रीच्या सत्रात कवी संमेलन आयोजित केले होते. कवी संमेलनात निमंत्रित कवींनी वास्तववादी ग्रामीण जीवनावर आधारित आपल्या कविता सादर केल्या. या संमेलनात कवी माधव गव्हाणे, दिगंबर रोकडे, संभाजी रोडगे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजाराम झोडगे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनंत मोगल तर आभार परमेश्वर काष्टे यांनी मानले.
18 जानेवारीच्या सकाळच्या सत्रात गावातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्कूल कनेक्ट अभियान – 2.0 उपक्रमांतर्गत साक्षरता जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात श्रद्धा गिराम,
उषा काकडे, नंदिनी शिंदे ,ऋतुजा ढगे, ओंकार लहाने ,वैभव लहाने ,दानिश अन्सारी ,अशोक खोसे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर या पथनाट्याचे लिखाण प्राध्यापिका शुभांगी नायकल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक सुरेश उगले, प्राध्यापक डॉक्टर कीर्ती निरालवाड, प्राध्यापक विशाल पाटील, प्राध्यापक डॉक्टर शिवराज घुलेश्वर,प्राध्यापक महेश कुलकर्णी, प्राध्यापिका आर जे नाथानी, प्राध्यापिका अर्चना ठोंबरे यांनी परिश्रम घेतले.
यावेळेस गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!