आपला जिल्हा

विरशैर स्मशानभूमीत घुसले नाल्याचे पाणी… शिवा संघटने तर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*

सेलू(प्रतिनिधी ) येथील सर्व्हे नंबर 33 मधिल विरशैव स्मशानभूमी लगत असलेला नाला उपसण्याचे काम जेसीबी च्या सहाय्याने न.प.कडून केले जात आहे त्यामुळे नाल्याचे पाणी स्मशानभूमित घुसल्याने जागोजागी खड्डेपडून पाणी साचल्याने दुर्गंधी पसरत असून ऐन पावसाळयात मयताचा अंत्यविधी कसा करावा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मंगळवार दिनांक 03 जून रोजी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्मशान भूमिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेले कचऱ्याचे ढीग काढावेत, चिल्हारीची काटेरी झुडपे साफ करावीत, नालापिचिंग करावे, स्मशानभूमीतील अंतर्गत रस्ते, सिमेंटची बाके , स्मशान भूमिला उत्तर- पश्चिम संरक्षक भिंत बांधावी, लाईट व्यवस्था करावी, टॅक्टरने जागा लेव्हलिंग करून साफसफाई स्वच्छता करावी, प्रवेशद्वार बांधण्यात यावे, वृक्षारोपन करावे, सर्व्हे नंबर 33 ची 7/12 वर नोंद असलेली 80 आर जमीनीची मोजणी तात्काळ करावी, पुलासमोरील खड्डे बुजुन द्यावेत, बंद झालेला पाण्याचा हातपंप पुन्हा सुरू करण्यात यावा या सर्व समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्याथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, तालुकाध्यक्ष निजलिंगअप्पा तरडगे, बबनअप्पा झमकडे, गणेश गोरे, रामा कटारे, सुजीत मिटकरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!