आपला जिल्हा

नूतन विद्यालयाच्या ९३ च्या दहावी बॅचचे स्नेह मिलन संपन्न

३२ वर्षांनंतरच्या भेटीने भारावले मित्र

सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित नूतन विद्यालयाच्या १९९३ च्या दहावी बॅचचे स्नेह मिलन रविवार ( दि. ०१) रोजी छत्रपती संभाजी नगर येथील हॉटेल सिल्व्हर इन मध्ये उत्साहात संपन्न झाले. स्नेह मिलन सोहळ्यात नूतन विद्यालयाचे ८० माजी विद्यार्थी एकत्र आले होते. ३२ वर्षांनंतर आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणींना पाहून सर्व भारावून गेले. आपल्या बाल मित्रमैत्रिणींच्या भेटीचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. स्नेह मिलन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुणे, नागपूर , सेलू, हैदराबाद, तसेच राज्याच्या विविध भागातून मित्रमैत्रिणी एकत्र आले होते. ३२ वर्षांनंतर आपल्या वर्ग मित्रमैत्रिणीचे बदललेले रुपडे बघुन झालेले नवल चेहऱ्यावर लपत नव्हते. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारण्यात सुरुवातीचा वेळ गेल्या नंतर व्यासपीठावर येवून प्रत्येकाने स्वतः चा परिचय देऊन आपण सध्या काय करतो हे सांगितले. दुपारच्या सत्रात काही मित्र मैत्रिणींनी काव्य वाचन केले. तसेच आपल्या शालेय जीवनातील रम्य आठवणींना उजाळा देत भूतकाळ जागवला . तर काहीनी गीत गायन केले. पुढील वर्षी स्नेह मिलन कार्यक्रम सेलू येथे आयोजित करण्याचा ठराव घेवून जड अंतःकरणाने सर्वांनी निरोप घेतला. माजी विद्यार्थी स्नेह मिलन यशस्वीतेसाठी आनंद माणकेश्वर, आदिती दशरथी, मधुरा आनंद गावकर, सुषमा शिकारे, अनुराधा देशपांडे, डॉ. सतीश मगर, राहुल रणशिंग, स्वप्निल टाकळकर, उमेश भोपी यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!