आपला जिल्हाताज्या घडामोडी
निवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा सेवेतील पोलिसाप्रमाणे आरोग्य लाभ मिळवून देऊ – नामदार मेघना दीदी बोर्डीकर

परभणी ( प्रतिनिधी ) आज दि.०१ जून रोजी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी पोलिस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था परभणी यांचा दुसरा वर्धापन दिनानिमित्त भ्रमणध्वनी वरून बोलतांना नामदार मेघना दीदी बोर्डीकरानी निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा सेवेतील पोलिसाप्रमाणे आरोग्य लाभ मिळवून देऊ अशी गाव्ही दिली.
या वेळी व्यासपीठावर राहुल पाटील,आमदार परभणी विधान सभा, मा. राजेश भैय्या विटेकर पाथरी विधान सभा, मा. रत्नाकर गुट्टे, गंगाखेड विधान सभा, प्रथम महापौर प्रताप भैय्या देशमुख , परभणी,हिंगोली जिल्हा अध्यक्ष एस एस चव्हाण , व त्यांची टीम.अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधी भिमराव खंडारे, वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी रमेश ताजने,नांदेड शाक्य संघ विजय उजेडकर व त्यांची टीम,नांदेड समर्पण चे श्री.केंद्रे ,संभाजी होनराव व त्यांची टीम, बीड येथील अन्वर शेख, पवार मॅडम व त्यांची टीम चे लोक सह परभणीचे सर्व सन्माननीय सदस्य कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित होते.
सर्व प्रथम पहलगाम व सैनिक व पोलिस शहीत झालेल्याना दोन मिनिट शांत राहून श्रद्धांजली वाहण्यात आली, माननीय राहुल पाटील साहेब आमदार परभणी विधानसभा प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख यांचे उपस्थितीत दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आ. राहुल पाटील यांनी पोलिसांच्या मागण्याबाबत पावसाळी अधिवेशन मध्ये पाठपुरावा करण्यात येईल असे ठासून सांगितले तसेच पोलिसांना सेवानिवृत्त पोलिसांना त्यांना पोलीस अधीक्षक साहेबांनी कार्यलयासाठी दोन रूम द्याव्यात अशी मागणी करताच लागलीच त्यांनी पोलीस अधीक्षक साहेबांना फोन करून बोलणे केले व पावसाळी अधिवेशन मध्ये महसूल विभागाप्रमाणे पोलिसांची वेतनश्रेणी मिळालीच पाहिजे म्हणून मी प्रश्न उपस्थित करेल असे सांगितले.