आपला जिल्हा
दहावीच्या परीक्षेतील यशा बद्दल नूतन शिक्षण संस्थे तर्फे स्वराज जाधवचा सत्कार

सेलू ( प्रतिनिधी) येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थी स्वराज लक्ष्मण जाधव याचा दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाले या बद्दल गुरूवार ( दि. १५ ) रोजी नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि दीपस्तंभ प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, नूतन विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष सितारामजी मंत्री, मुख्याध्यापक संतोष पाटील, स्वराजची आई गोकर्णा जाधव ,पत्रकार अशोक अंभोरे, भाजप तालुका अध्यक्ष गणेशराव काटकर, दीपस्तंभ प्रतिष्ठापनचे तालुका अध्यक्ष माधव अण्णा लोकुलवार, वाल्मीक खुळे, पप्पू शिंदे, मंजुषा कुलकर्णी, पत्रकार श्रीपाद कुलकर्णी, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, डॉ. सुरेश हिवाळे, शिक्षक प्रतिनिधी भगवान देवकते, विजेंद्र धापसे, विशाल क्षीरसागर, बालाजी देऊळगावकर यांची उपस्थिती होती.




