आपला जिल्हा

परभणी जिल्ह्यात २४ तासात सरासरी १३.५ मि.मी. पाऊस

सेलू तालुक्यात सर्वाधिक (३०.८ मिमी ) पाऊस

परभणी, दि.२६ ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी १३.५ मिलीमीटर पाऊस पडला असून, सेलू तालुक्यात सर्वाधिक (३०.८ मिमी ) पाऊस झाला आहे. याशिवाय पाथरी (२६.४), सोनपेठ (२२.७) मानवत (१५.५), जिंतूर (१४.३), पालम (१०.८), गंगाखेड (६.५), पुर्णा (३.८) आणि परभणी तालुक्यात सर्वात कमी (१.९ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागाचा विचार करता, गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही परभणी जिल्ह्यात पडलेल्या सरासरीपेक्षा कमी असून, ती १०.५ मिमी राहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!