आपला जिल्हा

नूतन कन्याची उज्वल निकालाची परंपरा कायम

सेलू ( प्रतिनिधी ) येथील श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागाने बारावी परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत फेब्रुवारीमध्ये संपन्न झालेल्या बारावीच्या परीक्षेत नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागाचा ९५.३८ टक्के निकाल लागला आहे. जो की, छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या निकालापेक्षा अधिक आहे. छत्रपती संभाजी नगर विभागाचा निकाल ९२.२४ आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवार ( दि. ०५ ) रोजी बारावीचा निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेत श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागाचा कला शाखेचा ९५.५५ टक्के आणि

वाणिज्य शाखेचा ९६.५५ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत भक्ती विजय शेलार ( ८२.१७ ) , अक्षरा मधुकर गायकवाड ( ६७.१७ ), दिपीका विजय राठोड ( ६६. ८३ ) तर वाणिज्य शाखेत गायत्री कल्याण जाधव ( ७५.५० ), श्रध्दा दत्तराव चव्हाण ( ६९.५० ), स्नेहल ज्ञानेश्वर गायके ( ६९.००) टक्के घेऊन या विद्यार्थीनींनी विद्यालयात अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे. या यशा बद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी , कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता , कन्या प्रशालेचे शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती मुख्याध्यापक निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तात्रय घोगरे यांनी गुणवंत विद्यार्थीनी तसेच बारावी वर्गाला शिकविणारे शिक्षक प्रा. सपना काला, डॉ. यशवंत कुलकर्णी, डॉ. सुरेश हिवाळे, सुरेखा आगळे, विजय धापसे, रवी कदम , स्नेहल दगडू यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!