आपला जिल्हा

सेलू चित्रपटगृहात “फुले” चित्रपट प्रदर्शीत करण्याची मागणी

सेलू ( प्रतिनिधी ) संपूर्ण भारतभर गाजत असलेला क्रांतिजोती महात्मा फुले व ज्ञानजोती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारीत फुले चित्रपट २५/०४/२०२५ रोजी चित्रपट गृहात  प्रदर्शीत झालेला आहे. परंतू आपण अद्याप पर्यंत सदरील चित्रपट सेलूतील आपल्या सिनेमा गृहात प्रदर्शीत करण्यात आलेला नाही. यापुर्वी आपण महात्मा फुले यांचा सत्यशोधक सिनेमा सुध्दा स्वतःहून प्रदर्शीत केला नव्हता. फुले प्रेमींनी आपणाकडे येवून सत्यशोधक सिनेमा प्रदर्शीत करण्याची विनंती केल्यानंतर आपण “एक शो बुक करा” असे सांगीतले होते. त्यावेळी फुले प्रेमींनी सत्यशोधक सिनेमाचा एक शो बुक केल्यानंतर आपण सत्यशोधक सिनेमा प्रदर्शीत केला होता. त्यामुळे फुलेप्रेमींची अशी धारणा झाली आहे की, आपण केवळ जातीय द्वेषातून फुले यांचा सिनेमा प्रदर्शीत करत नाहीत, महाराष्ट्रातील चित्रपट गृहात फुले या सिनेमास खुप मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असतांना देखील आपल्या चित्रपट गृहात सदर सिनेमा अद्याप पर्यंत प्रकाशीत करण्यात आलेला नाही.

तरी आपण तात्काळ आपल्या चित्रपटगृहात फुले चित्रपट प्रदर्शीत करण्यात यावा. अन्यथा भविष्यात फुलेप्रेमी आपल्या चित्रपट गृहावर बहिस्कार टाकतील याची गांर्भीयाने नोंद घ्यावी.
या प्रकारचे निवेदन सेलू सिनेमागृह चालकांना देण्यात आले या निवेदनावर अशोक अंभोरे, प्रभाकर इंगळे, ऍड.प्रभाकर गिराम सह फुले प्रेमी, सेलू तालुका यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!