आपला जिल्हा

महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी नगरपरिषद कडून फुलेप्रेमीच्या निवेदनाला केराची टोपली

⬛ पुतळा परिसरात ना टेन्ट ना पिण्याच्या पाण्याची सोय ना रोषणाई

सेलू ( प्रतिनिधी ) ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमीत्त फुलेनगर सेलू येथील पुतळया जवळ उन्हापासून बचावासाठी मंडप, पिण्याचे पाणी आणि रोषणाई साठी फुले प्रेमीनीं मुख्याधिकारी यांना बुधवार दि 9 एप्रिल रोजी निवेदन देऊन मागणी केली होती. परंतू आज जयंती दिनी पुतळा परिसरात नगर परिषदेकडून फुले प्रेमिची कोणतीच मागणी पूर्ण न करता निवेदनास केराची टोपली दाखवली त्या मुळे सेलू परिसरातील फुले प्रेमिकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात
११ एप्रिल २०२५ वार शुक्रवार रोजी महात्मा फुले यांच्या जयंती निमीत्त फुले नगर येथे पुतळया जवळ मंडप टाकण्यात यावा तसेच आजूबाजूचा परीसर विदयुत रोशनाई करण्यात यावी व परीसर स्वच्छ करण्यात यावा तसेच तेथे पाण्याची व्यवस्था व रात्री लाईट ची व्यवस्था करण्यात यावी हि मागणी ऍड प्रभाकर गिराम, राजेभाऊ राऊत,प्रभाकर गोविंदरराव इंगळे यांनी केली होती.

 

सदरील बातमी प्रकाशित झाल्या नंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग आणि 11 वाजल्या नंतर केली टेन्ट ची व्यवस्था

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!