आपला जिल्हा

आकाशाशी जडले नाते… भूगोल दिनानिमित्त नूतन चा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) नूतन विद्यालय सेलू येथे भूगोल दिनाच्या पूर्वसंध्येला ‘आकाशाशी जडले नाते । हा अवकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सितारामजी मंत्री, नूतन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी. के देशपांडे गुरुजी, नूतन शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य पावडे नाना यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

 

या कार्यक्रमा अंतर्गत सेलू तालुक्यातील उपस्थितांना चंद्र, गुरु, शनी हे ग्रह व उपग्रह टेलिस्कोप च्या माध्यमातून दाखवण्यात आले. आपल्या पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राला इतक्या जवळून पाहताना त्यावरील विविध डाग, प्रकाशित भाग, पाहून विद्यार्थी भारावून गेले.

सेलू तालुक्यातील जेष्ठ नागरिक, पत्रकार, हौशी खगोल अभ्यासक विविध शाळेचे मुख्याध्यापक व शिशक मोठ्या संख्येने नूतन विद्यालयातील प्रार्थना मैदानावर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी नूतन विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक के के देशपांडे पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सामाजिक शास्त्र विभागप्रमुख सुधीर जोशी सरांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!