आपला जिल्हा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे 9 मार्चला परभणीत अनावरण

⬛ माजी उपमुख्यमंत्री मा.आ.छगनरावजी भुजबळ , मा.ना. अतुलजी सावे,मा.ना.जयकुमारजी गोरे,पालकमंत्री मा.ना.मेघनादिदी बोर्डीकर यांची उपस्थिती

परभणी ( प्रतिनिधी ) भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचनाऱ्या  देशातील पहिल्या शिक्षिका,मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण महात्मा फुले स्मारक परभणी येथे रविवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता  महाराष्ट्राचे माजी उपामुख्यमंत्री छगनराव भुजबळ, मा.ना. अतुलजी सावे, मा.ना.जयकुमारजी गोरे, पालकमंत्री मा.ना.मेघनादिदी बोर्डीकर यांची उपस्थितीत होणार आहे.

परभणी शहरातील स्टेडीयम परीसरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळ्याच्या बाजुला नियोजीत असलेला  जागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांचा पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.
परभणी येथील महात्मा फुले स्मारकांमध्ये केवळ महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा असल्याने त्या ठिकाणी त्यांच्या सोबतच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा देखील असावा महात्मा फुले यांच्या सोबतच सावित्रीबाई फुले यांनी देखील दिन, दलित, दुबळ्या समाजासाठी  आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे अशी मागणी परभणी जिल्ह्यातील बहुजन समाजाकडून सातत्याने होत होती त्या मागणीला अखेर यश आले असून आता 9 मार्च रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारल्या जाणार असल्याने परभणी जिल्ह्यातील समस्त फुले प्रेमी कडून आनंद व्यक्त केला जात आहे.

या कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन रोहीत लक्ष्मणराव राऊत मुख्य संयोजक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा संयोजन समिती,परभणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!