आपला जिल्हा

पालिका प्रशासनाच्या अधिमूल्य निशचितीच्या विरोधात सेलू शहर कडकडीत बंद

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू नगर पालिकेच्या अधीमूल्य निश्चितीच्या विरोधात सेलू शहरातील न्यू व्यापारी असोसिएशनच्या वतीने आज दिनांक 28 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सेलू शहर कडकडीत बंद पाळून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी सेलू यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले.

सेलू नगरपालिका प्रशासक प्रशासनाच्या वतीने अधिमुल्य वाढ आणि भाडे वाढ केल्यामुळे व्यापारी आणि गाळेधारकांनी या विरोधात सेलू शहर कडकडीत बंद ठेवत सेलू शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा काढून निषेध आंदोलन केले सेलू नगरपालिकेने शहरातील गाळेधारक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता ही भाडे वाढ आणि अधिमुल्य वाढ केले असून यामुळे व्यापारी देशोधडीला लागणार आहेत अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे असा आरोप यावेळी व्यापाऱ्यांनी केला त्यामुळे सेलू शहरातील व्यापाऱ्यांनी आज सेलू शहर कडकडीत बंद पाळत दुपारी 3 वाजेच्या सुमारास सेलू उपविभागीय अधिकारी आणि पालिका मुख्याधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर अमर बीर सिंग बब्बर, गणेश भिसे, दीपक दायमा, सय्यद रियाज भाई, शेख रफिक भाई, सुहास पंडित, विशाल संघई, राजेश परतानी, दिलीप बादाडे, सुमित व्यास ,प्रकाश रेडे, जनार्दन फंड, हितेश शहा, अब्दुल सत्तार बागबान, सय्यद मुशताक रब्बानी, शेख रहीम, अब्दुल सत्तार ,मोहम्मद सलीम, इस्माईल कुरेशी, वसंत तमखाने, हेमंत दरेकर, संतराम काष्टे ,अरुण भुतडा, ईश्वर जैन, गोलू पटवारी, प्रवीण मानकेश्वर, अबरार खान पठाण, यांच्यासह सेलू शहरातील शेकडो व्यापाऱ्यांचे स्वाक्षऱ्या आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!