सेलू ( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित कै. श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेच्या वतीने आंतरराष्ट्रीय किर्तीचे विचारवंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय समन्वयक प्रकाश करात यांच्या व्याख्यानाचे शुक्रवार, दि.२८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाची ७५ वर्षे नवीन आव्हाने या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानामालचे हे ४९ वे वर्ष आहे. जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस. एम. लोया, चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही. के. कोठेकर, संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सहसंयोजक प्रा. सुभाष बिरादार यांनी केले आहे.