आपला जिल्हा
सेलू तून कबड्डीचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील- प्रा.डॉ. माधव शेजूळ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जन्मोत्सवा निमित्य स्पर्धेत 80 संघ व 950 खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

सेलू (प्रतिनिधी ) सेलू शहर व तालुक्याला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण क्रीडा व शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे, त्यामुळे भविष्यात सेलू तालुक्यातून कबड्डीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निश्चित घडतील असा विश्वास महाराष्ट्रराज्य अथेलॅटीक्स संघटनेचे खजीनदार ,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ. माधव शेजूळ यांनी व्यक्त केला.




