आपला जिल्हा

दिल्ली येथील साहित्य संमेलनात डॉ. सुरेश हिवाळे यांचा सहभाग

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू : येथील नूतन विद्यालयातील सहशिक्षक कवी डॉ. सुरेश हिवाळे यांचा ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यात सहभाग आहे. सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे २१, २२, २३ फेब्रुवारी रोजी होते आहे. या मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यात डॉ. सुरेश हिवाळे यांच्या ‘ भारतीय ‘ कवितेची निवड झाली असून सदर कविता ते रविवार ( दि. २३ ) रोजी संमेलनातील महात्मा ज्योतिराव फुले सभामंडपात सादर करणार आहेत. ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सहभागा बद्दल डॉ. सुरेश हिवाळे यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी , मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, डॉ. अशोक पाठक, डॉ. शरद ठाकर, किशोर कटारे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, माधव गव्हाणे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!