सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील गटकळ अकॅडमी ची विद्यार्थिनी कु. भावना कैलासचंद चौधरी याची एमपीएससी द्वारे कर सहाय्यक व महसूल सहायक या पदावर नियुक्ती झाली.
तिच्या या नियुक्तीमुळे सेलू तालुक्यातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत असून गटकळ अकॅडमीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सेलू शहरातील मठगली येथे राहणाऱ्या कु भावना कैलासचंद चौधरी यांनी सेलू येथील गटकळ अकाडमी जॉईन करून योग्य मार्गदर्शन घेतले आणि दिलेल्या परीक्षेतील घवघवीत यश संपादन केले आहे. तिला गटकळ अकॅडमी चे संचालक रामेश्वर गटकळ व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.