आपला जिल्हा

सेलूच्या नूतन विद्यालयातील नवीन जलकुंभाचे उद्घाटन

लोया, बिनायके परिवाराचा पुढाकार

सेलू ( प्रतिनिधी ) जि.परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयातील १५ हजार लिटर क्षमतेच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या नवीन जलकुंभाचे तसेच आरो सिस्टीमचे उद्घाटन मंगळवारी, तीन ऑक्टोबररोजी सोमनाथ कामटे (इयत्ता पाचवी) या विद्यार्थ्यांसह मान्यवरांच्या हस्ते नामफलक अनावरणाने झाले. याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, दत्तराव पावडे, बद्रीविशाल लोया, ललित बिनायके, मनोजकुमार बिनायके, परेश बिनायके, अभियंता बी.एस.कोलते, एन.वाय.सोळंके, संतोष पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या पिढीपासून लोया आणि बिनायके परिवाराने विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभांची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. चौथ्या पिढीनेही हा वारसा जपला आहे‌. बद्रीविशाल लोया यांनी स्व.चुनिलालजी, जानकीलालजी, कमलकिशोरजी यांच्या स्मरणार्थ आरो सिस्टीमसह तीन लाख रूपये, तर स्व.कमलाबाई इंदरचंदजी, पदमकुमारजी बिनायके यांच्या स्मरणार्थ बिनायके परिवाराने दोन लाख रुपये आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या संयुक्त आर्थिक योगदानातून सुमारे साडे आठ लाख रुपये खर्चून आरो सिस्टीमसह नवीन जलकुंभ उभारण्यात आला आहे, अशी माहिती जयप्रकाश बिहाणी यांनी यावेळी दिली. अनेकांच्या जडणघडणीत नूतन विद्यालयाचे योगदान आहे. पाण्याचा टाकीच्या उभारणीत खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली. याचा आनंद आहे, असे ललित बिनायके व बद्रीविशाल लोया यांनी नमूद केले. प्राचार्य डॉ.कोठेकर, डॉ.लोया यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक लिंबेकर यांनी स्व.शंकरराव मंडलिक गुरुजींच्या आठवणी सांगितल्या. प्रास्ताविक जयप्रकाश बिहाणी यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर यांनी केले. मुख्याध्यापक नारायण सोळंके यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!