आपला जिल्हा

अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा बंदोबस्त करा सेलू पोलिसांना निवेदन

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा वावर वाढत आहे. अष्टविनायक मंदिर शास्त्रीनगर साईबाबा मंदिर महेश नगर, जायकवाडी परिसर व इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी अश्लील जाळे करणारे खुलेआम अश्लील चाळे करत आहेत त्यामुळे तेथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

कधी बोलायला गेल्यास ही जोडपी हमरी तुमरीवर येत आहेत. या जोडप्यांमुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहेत तसेच देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना यांचा त्रास होत आहे आता 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येत आहे त्यामुळे या जोडप्यांचे जास्तच पेव फुटत आहेत यामध्ये भरपूर मुली अल्पवयीन आहेत तरी ताबडतोब या अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा बंदोबस्त करावा. नसता भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने यांचा बंदोबस्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
अश्या आशयचे निवेदन आज सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना देण्यात आले या निवेदनावर शेळके जयसिंग, उध्दवराव शेळके
नागेश ठाकुर,सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!