सेलू (( प्रतिनिधी ) राष्ट्रीय एकात्मकताचे प्रतीक असलेल्या परभणीचे सुफीसंत हजरत सय्यद शाह तुरबुल हकक यांच्या उर्सानिमित जन सहयोग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेमूद खान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कार्यगौरव सोहळा 9 फेब्रुवारी रविवार रोजी परभणी शहरातील मास्टर कॅफे हॉलमध्ये उत्सहात संपन्न संपन्न झाला यावेळी पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल सेलू येथिल ए स्टार न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार अबरार बेग यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परभणी शहरतील प्रसिद्ध विधीतज्ञ अशोक सोनी तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे डॉ. नीता गायकवाड मॅडम.प्रमुख अतिथी म्हणून रेल्वे कॉन्ट्रैक्टर एजाज फारूखी,शिवसेना नेते जलील पटेल,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेते, गफ्फार मास्टर, इंजीनियर जावेद शेख, पोलिस उप निरीक्षक इरफान इनामदार, फरहा नाज मैडम,सना एजुकेशन सोसायटीचे सचिव सय्यद मुजाहिद अली, गव्ह.कॉन्ट्रैक्टर सय्यद गौस मोहियोद्दीन,मोहम्मद सरफराज अहेमद,पोलिस कांस्टेबल सय्यद शाकीर,फहीम काझी, ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे, सरफराज शेख, राष्ट्रवादी युवा नेते शाहीद सिद्दिकी, ए. स्टार न्यूज के संपादक अबरार बेग,आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी कार्यक्रमाचे संयोजक महेमूद खान यांनी उपस्थीत मान्यवरांचा स्वागत सत्कार केला वक्तृत्व स्पर्धेत परभणी शहरातील उर्दू शाळेतील 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आले.
तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना महारष्ट्र रत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या वेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी,मुख्याध्यापक,शिक्षक, व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते,कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा,अरूण पडघण,शिक्षक जावेद अन्सारी,असिफ सर, हुसेन अन्सारी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक तथा जन सहयोग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेमूद खान यांनी मानले.