आपला जिल्हा

अशोक नाना काकडे यांचा मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत उद्या भाजपमध्ये प्रवेश

सेलू तालुक्यातील 25 गावचे सरपंच सह मार्केट कमिटीचे काही संचालक व असंख्य कार्यकर्ते जाणारभाजपामध्ये

सेलू ( किशोर कटारे )  सेलू तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सभापती तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते तसेच माजी आमदार विजय भांबळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अशोक नाना काकडे यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडवणीस तथा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त न्यूज महाराष्ट्र 36 च्या हाती लागले आहे.

  सेलू तालुक्यातील जवळपास 25 गावचे सरपंच   सेलू येथील मार्केट कमिटी येथील काही संचालक  यांच्यासह सेलू तालुक्यातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!