आपला जिल्हा

सौ. सावित्रीबाई बद्रीनारायण बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील प्राथमिक शाळेत दि. 05 फेब्रुवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. मकरंद दिग्रसकर,प्रमुख पाहुणे- मा.डॉ.  .एन.टी कुंदनानी (एम.डी.बालरोग तज्ञ) तसेच मा. दत्तरावजी पावडे, मा .राजेशजी गुप्ता, मा.  संपतराव खरात उपस्थित होते..शालेय मुख्याध्यापक मा.बेंडसुरे एस. डी. यांची उपस्थिती होती.

 कार्यक्रमात बाल सभेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यीकरण सादर करण्यात आले. कार्यक्रमात गुणवत्ता पारितोषिक, कृष्णरूप सज्जा व विषय स्पर्धा पारितोषिक, तसेच विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाल सभेचे चिमुकले विद्यार्थी कु. ढाकणे अनया व चि. इंगळे पृथ्वीराज यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच पालकांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!