सेलू (प्रतिनिधी ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जन्मोत्सवा निमित्य येथील सार्वजनीक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक 18 व 19 फेब्रुवारी रोजी आंतरशालेय कबड्डी , शिव मॅरेथॉन व सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व वाचन संस्कृती वाढीस लागावी , मोबाईल वरील खेळात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मैदानावर सक्रीय करणे , सुदृढ आरोग्य व निर्व्यसनी तरूण पिढी व सुदृढसमाजाची उभारणी करण्याच्या उद्देशाने या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी स्पर्धा 5 वी ते 7 वी व 8 वी ते 9 वी मुले- मुली अशा स्वतंत्र दोन गटात खेळवण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. कबड्डी स्पर्धा नूतन विद्यालय इनडोअर क्रीडा हॉल मध्ये तर सामान्यज्ञान स्पर्धा 16 फेबुवारी रोजी श्री के.बा.विद्यालयात होणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना मोफत प्रवेश व कबड्डी खेळाचे संपूर्ण गणवेश संयोजन समितीच्या वतीने मोफत देण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वितेसाठी विवीध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली. या आंतरशालेय तालुकास्तरीय क्रीडा व सामान्यज्ञान स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन क्रीडा व वाचन संस्कृती चळवळ वृध्दींगत व बळकट करण्याच्या उपक्रमात कृतीशील योगदान द्यावे असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गोविंद काष्टे , उपाध्यक्ष दत्तात्रय सोळंके (अप्पूसेठ), सचिव रामेश्वर शेरे यांच्या सह भाऊराव घांडगें, नाना पवार, तान्हाजी भोसले, सर्जेराव लहाने, विलास खरात, आत्माराम हरकळ , वाल्मीक सोनवणे, गणेश माळवे, प्रशांत नाईक, संजय भूमकर, राजेभाऊ चव्हाण, शरद मगर, सुभाष मोहकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे. बैठकीसाठी समाजबांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.