सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरातील फुले नगर परिसरातील पिसाळलेल्या माकडानी या परिसरातील चार ते पाच नागरिकांना चावा घेऊन जख्मी केले होते. तर गेल्या दोन दिवसा पासून फुले नगरात धुमाकूळ घातला होता.
आज या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्यासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांनी सापळा लावून पिंजऱ्यात केले जेरबंद. माकड जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.