आपला जिल्हा
रक्तदान शिबीरे ही काळाची गरज – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
सेलूत रक्तदान शिबिरात 300 जणांचे रक्तदान

सेलू ,(प्रतिनिधी) : रक्तदान शिबीरे ही काळाची गरज असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच ती एक चळवळ झाली पाहिजे, त्यासाठी आपण सेलूत केमिस्ट भवनाच्या उभारणीसाठी सहकार्य करु, असे आश्वासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.




